logo

लाल बहादुर शास्त्री विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा....


विद्यार्थी अनेक उपक्रमांच्या, कलेच्या तसेच परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचे व शाळेचे नाव विविध स्तरावर उंचावण्याचे काम करतात. त्याचाच एक भाग श्रेया इंटेलिजट अकॅडमी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये लाल बहादुर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घव-घवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तूरा लावण्याचे कार्य केले.
नुकत्याच लागलेल्या श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षेत लाल बहादुर शास्त्री विद्यालयाचे ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत यामध्ये इयत्ता पहिलीतील प्रांजल असोले (वर्ग पहिली) १०० गुण घेऊन केंद्रात व राज्यात प्रथम, माहेश्वरी बोड्डेवार (वर्ग पहिली)९८ गुण घेऊन राज्यात द्वितीय,निशिता साबळे (वर्ग पहिली)९८ गुण घेऊन राज्यात द्वितीय, संचिता यशवंते(वर्ग पहिली) ९६ गुण घेऊन राज्यात तिसरी, उत्कर्ष गवळे (वर्ग पहिली )९६गुण घेऊन राज्यात तिसरा, सृष्टी शिंदे(वर्ग पहिली )९४ गुण घेऊन राज्यात चौथा क्रमांक, पटकावला तसेच स्वरा आहेर (वर्ग दुसरी)९६ गुण घेऊन राज्यात तिसरी व जिजाऊ बर्वे(वर्ग तिसरी) २५४ गुण घेऊन राज्यात पहिली आली.
या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री संदिप चव्हाण, ,दोन्ही माध्यमाचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

44
3556 views